स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कुसुंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एम. के. शिंदे विद्यालय, कुसुंबा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष तथा चेअरमन रावसाहेब अविनाशजी शिंदे, सचिव सुनितामाई शिंदे, विश्वस्त विश्वनाथ आप्पा शिरुडे तसेच सचिव . चेतन दादा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण, शिस्त, एकता आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमास विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक कुसुंबा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला.








0 Comments