'अनुसूचित जातींसाठी आरक्षणाचे उप-वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात रविवार, धडक महा मोर्चा' मालेगाव

 मालेगाव महा मोर्चा: अनुसूचित जातींसाठी आरक्षणाचे उप-वर्गीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात रविवार

२३ ऑगस्ट रोजी  आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 'धडक महा मोर्चा

आयोजित करण्यात आला होता. आंदोलकांनी उप-वर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची, अनुसूचित जातींसाठी आरक्षण कायम ठेवण्याची आणि माजी न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी केली.



महा मोर्चा दुपारी १ वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून सुरू झाला. हा मोर्चा कॅम्प रोडमार्गे एकता चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत गेला. आंदोलकांनी विविध मागण्यांसंदर्भात फलक हातात धरले होते आणि घोषणा दिल्या. मोर्चानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक जाहीर सभा घेण्यात आली.

सरकारने निर्णय रद्द करावा अशी मागणी

सभेला संबोधित करताना आनंदराज आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी सांगितले की, उपवर्गीकरणाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मातंग समाज आमच्यासोबत आहे. सरकार जबरदस्तीने उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या एकूण राजकीय अजेंड्यामुळे समाजात अंतर्गत संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

अनुसूचित जाती एक आहेत: आनंदराज आंबेडकर

माजी मंत्री बाबनराव घोलप, ॲड अमन आनंदराज आंबेडकर आणि रुक्मिणी लोंढे हे या भव्य सभेतील प्रमुख उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments