🇮🇳 सत्यवती कौर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 🇮🇳 सत्यवती कौर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा



टोकडे : सत्यवती कौर विद्यालय, टोकडे येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्षा स्मिताताई फरस उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे ध्वजारोहण  जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ शेजवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब शांतारामजी लाठर, संस्थेचे सेक्रेटरी  अजित बाबा लाठर, शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. फरस सर, टोकडे गावचे सरपंच शालिग्राम साळुंखे, झोडगे गटातील शिवसेनेचे प्रमुख हाटुसिंग धाडीवाल, बोर्डिंगचे अधीक्षक विठोबा डिंगर, भावलाल दादा निमडे, सोपान दादा लिद्दड, यशवंत डिंगर, विनोद भाऊ रंगी, तसेच टोकडे गावातील ग्रामसेवक काकवेपुरे यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर संगीतमय कवायत व शिस्तबद्ध संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या शानदार सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

विद्यार्थ्यांनी केलेल्या कवायत, संचलन व विविध उपक्रमांच्या तयारीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी सादरीकरण केले.

“देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी” हा संदेश देत सत्यवती कौर विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments