दुष्काळ जाहीर केला, पण मदत कधी?’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल


‘दुष्काळ जाहीर केला, पण मदत कधी?’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

‘दुष्काळ जाहीर केला, पण मदत कधी?’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मदतीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला, मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत देण्यासाठी विलंब केला जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

शेतकऱ्यांच्या हातातलं पीक गेलं असून अनेक शेतकऱ्यांसमोर वर्ष काढण्याचं मोठं संकट आहे. सरकारने सरसकट मदतीचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी आणि मदतीसाठी अडीच हेक्टरची मर्यादा ठेवू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पीककर्ज कोणत्याही जाचक अटींशिवाय माफ करावं, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. केवळ कर्जाचं पुनर्गठन केल्यास शेतकरी पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली जाईल, असा दावा त्यांनी केला.

चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी तालुक्यासह ज्या भागात पावसाची कमतरता आहे, त्या भागांचाही दुष्काळाच्या मदतीत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पंचनाम्यांना विलंब होत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. दुष्काळ जाहीर करून मदत देण्यासाठी वेळ लागणार असेल, तर त्याचा शेतकऱ्यांना तातडीचा फायदा काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनीही दुष्काळ जाहीर करताना करण्यात आलेल्या उपाययोजनांवर टीका केली आहे. २६५ तालुक्यांमध्ये पहिला ट्रिगर लागू करण्यात आला असला, तरी तो आधी लागू व्हायला हवा होता, असा दावा त्यांनी केला.


 विरोधकांच्या या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे लक्ष लागलं आहे.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र राज्य | नाशिक | धुळे | नंदुरबार