जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कृषी पंप, तांब्याची वायर, एमएसईबी वायर, केबल तसेच सोलर पॅनेल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर दि. २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी चोरीच्या घटनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा व्यापक परिणाम साधण्यासाठी शेजारील जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील पोलिस यंत्रणेशीही समन्वय साधण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतांमध्ये कृषी पंप, तांब्याच्या वायर, एमएसईबी वायर आणि सोलर पॅनेल चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्यांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक ग्रामीण, जालना तसेच मध्य प्रदेशातील खरगोन, बुऱ्हाणपूर आणि बडवानी जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक प्रतिबंधात्मक आणि तपासात्मक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत

0 Comments