मोकाट कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी अनोखा एल्गार; निफाड नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले कुत्रे

 निफाड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निफाड नगरपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रारी व निवेदने करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी निफाड नगरपंचायतीत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.


आंदोलनकर्त्यांनी चक्क चार मोकाट कुत्रे नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलवर सोडून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्याधिकारी भामरे यांच्या टेबलला नोटांचा हार घालून निषेध नोंदविण्यात आला. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या तक्रारीही प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांकडे जाणार्‍या नागरिकांनाही मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे रंधवे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments