डोंगराळे येथे तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध; ग्रामस्थांकडून खैरनार कुटुंबाचे आभार

 डोंगराळे येथे तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध; ग्रामस्थांकडून खैरनार कुटुंबाचे आभार






डोंगराळे, ता. मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तलाठी कार्यालयासाठी गेल्या एक वर्षापासून जागेचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले असून तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध झाली आहे.

गावातील कै वसंत गौतम खैरनार यांनी तलाठी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली होती यासाठी प्रशासक विष्णू आप्पा ह्याळीज व भाऊसाहेब ह्याळीज यांनी चंद्रकांत वसंत खैरनार यांच्याकडे जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून खैरनार यांनी जागा उपलब्ध करून दिल्याने तलाठी कार्यालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला.

या पार्श्वभूमीवर तलाठी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने चंद्रकांत वसंत खैरनार यांचे जाहीर आभार मानण्यात आले. तलाठी कार्यालय गावात उपलब्ध झाल्यामुळे महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी ग्रामस्थांना मोठी सोय होणार आहे.

यावेळी प्रशासक विष्णू आप्पा ह्याळीज, गणेश सोनवणे, दत्तू खैरनार, शिवाजी गायकवाड, पृथ्वीराज दादा, सुरेश म्हसदे, प्रमोद खैरनार, चंद्रकांत खैरनार, रोहित ह्याळीज, राकेश ह्याळीज, पिंटू शिंदे, संतोष ठाकरे, अशोक खैरनार, किरण म्हसदे, अनिल पाटील, भूषण ह्याळीज, विशाल परदेशी, सुधीर पाटील, छोटू शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र राज्य | नाशिक | धुळे | नंदुरबार