Dhule Crime News: आधी महिलेला ब्लॅकमेल केलं, नंतर तिच्यासोबत नको नको ते केलं; तीन नराधम पोलिसांच्या ताब्यात; धुळे हादरले!
Dhule Crime News: धुळे शहरातील 80 फुटी रोड परिसरात एका महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यासोबत नको ते कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
Dhule Crime News: धुळे शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Azad Nagar Police Station) हद्दीतील 80 फुटी रोड परिसरात एका महिलेला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आझाद नगर पोलिसांनी तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Dhule Crime News)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिलेला विविध प्रकारे धमकावून आणि ब्लॅकमेल करून संशयितांनी तिच्यासोबत नको ते कृत्य केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी आणि परिसरात धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी अवघ्या काही तासांत 3 संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
: संशयितांची कसून चौकशी
शुक्रवारी (दि. 02) रात्री आझाद नगर पोलीस ठाण्यात संशयितांची कसून चौकशी करण्यात आली असून, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणात आणखी काय नवीन माहिती समोर येते आणि नेमक्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल केला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयितांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक आणि अंतिम कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे. तसेच, नागरिकांनी या घटनेबाबत सोशल मीडियावर किंवा परिसरात पसरणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments