Nashik : नाशिकच्या अंबडमधील केमिकलयुक्त पाणी प्रकरण; आतापर्यंत परिसरातील 11 कंपन्यांवर कारवाई
केमिकलयुक्त पाणी प्रकरणी नाशिकच्या अंबडमधील परिसरातील 11 कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नाशिकच्या अंबड-दत्तनगरमध्ये केमिकलयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिकांना केमिकलयुक्त पाणी येत असल्याचे नागरिक त्रस्त झाले होते
बोअरवेल आणि विहिरींमधून रासायनिक घटकयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांना त्वचेसह विविध आरोग्यविषयक समस्या झाले होते. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झालीये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. तब्बल 11 कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी सहा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. शनिवार आणि रविवारी अंबड व सातपूर एमआयडीसी परिसरात दिवसभर तपासणी मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

Short Summery
नाशिकच्या अंबड-दत्तनगर परिसरात केमिकलयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
बोअरवेल आणि विहिरींमधून रासायनिक घटकयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
या पाण्यामुळे नागरिकांना त्वचेसह विविध आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
आतापर्यंत परिसरातील ११ कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणखी सहा कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त पथकाकडून तपासणी केली जात आहे.
अंबड आणि सातपूर एमआयडीसी परिसरात शनिवार व रविवारी तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.

0 Comments