Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; बैठकीत झाला निर्णय


  प्रतिनिधी Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मिळत आहे. 

एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या आवर्तनातून ३०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जाणार असून २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्या 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील पाणी आरक्षण बैठकीत हा निर्णय झाला असून एकलहरे प्रकल्प, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, गोदाकाठच्या ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. गोदाकाठच्या सुमारे १० ते १५ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्यासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. 

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६३५ एमसीएफटी पाणी स्वतंत्र आरक्षित करण्यात आली असून गोदावरी नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध राहण्यासाठी आवर्तनाचे प्रभावी नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

 सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या आवर्तनातून ३०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जाणार आहे.

 २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा होणार आहे.

 जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय झाला.

 गोदाकाठच्या सुमारे १० ते १५ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

 सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६३५ एमसीएफटी पाणी स्वतंत्रपणे आरक्षित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र राज्य | नाशिक | धुळे | नंदुरबार