डोंगराळे येथे पुतळा आई व जैतोबा महाराज पब्लिक ट्रस्ट संस्थेचे शानदार उद्घाटन!


ग्रामस्थ, भाविक आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला उद्घाटन सोहळा

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे ग्रामदैवत पुतळा आई व जैतोबा महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट संस्थेचा उद्घाटन सोहळा २६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामस्थ, भाविक आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ट्रस्टचे उद्घाटन करण्यात आले.

या ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांना चालना मिळणार असून, गावातील धार्मिक परंपरा जपण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी 







दादा ठाकरे, समाधान ठोंबरे, प्रकाशदादा पाटील, बंटी  ह्याळीज, रवी आहिरे, अशोक म्हसदे, रवि म्हसदे, संजय म्हसदे, संजय शेजवळ,  ट्रस्टचे अध्यक्ष छोटू म्हसदे, पप्पू खैरनार, शंकर खैरनार, रावसाहेब गांगुर्डे, नरेश म्हसदे, ॲड नितीन नारायण म्हसदे ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शानदार उद्घाटन सोहळ्यामुळे डोंगराळे गावात धार्मिक व सामाजिक कार्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र राज्य | नाशिक | धुळे | नंदुरबार